Published On : Sun, Jul 30th, 2017

पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्वसन पूर्ण, क्षमता १४५ वरून १७५ वर

 
  • पेंच २ येथे १ ऑगस्ट रोजी १२ तासांचे शट डाऊन
  • लक्ष्मी नगर, धरमपेठ, गांधीबाग, मंगळवारी व हनुमान नगर झोनचा पाणीपुरवठा राहणार बाधित

PENCH-II WTP
नागपूर:
नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी संयुक्तपणे पेंच २ जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्वसन पूर्ण केले असून या केंद्राची फिल्टरिंग व पंपिंग क्षमता १४५ MLD वरून १७५ MLD इतकी वाढवण्यात आलेली आहे.

पेंच २ चे जुने जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे पुनर्वसित करण्यात आलेले असून पारंपारिक क्लेरीफ्लोक्यूलेटर तंत्रज्ञानाऐवजी आता केरी सेटलर (ट्यूब सेटलर) चा वापर करण्यात येणार आहे. रॅपिड सँड बेड फिल्टर रिडीज़ाइन करण्यात आले आहेत, बॅकवॉश प्रक्रिया अपग्रेड करण्यात आली आहे व यामुळे वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पंपिंग उपकरणे बसवण्यात आलेली आहेत.

दरम्यान येथे उल्लेखनीय आहे कि नुकतेच जवळजवळ एक शतक जुने ब्रिटीशकालीन “जुना गोरेवाडा” जलशुद्धीकरण केंद्र २९ जुलै २०१७ रोजी बंद करण्यात आले.

Gold Rate
Saturday 25 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जुना गोरेवाडा केंद्रावरून पुरवठा होणार्या सर्व भागांची आंतरजोडणी करण्यासाठी व इतर इलेक्ट्रीकल कामे पूर्ण करण्यासाठी मनपा-OCW ने १२ तासांचे मोठे शटडाऊन १ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्याचे ठरवले आहे. याकामांनी पेंच २ जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्वसन पूर्ण होउन त्याची क्षमता १४५ वरून १७५ MLD इतकी वाढेल.

१२ तासांचे हे शटडाऊन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत चालेल. या दरम्यान खालील कामे हाती घेण्यात येतील:

(a) पेंच २ स्वीचयार्ड येथे ११ kV VCB panel चे installation व commissioning,

(b) incomer व outgoing side चे HT केबल termination,

(c) 11kV Panel motor starter panel ची Assembly,

(d) पेंच २ ट्रान्सफॉर्मर यार्ड मध्ये 11kV/440 v Transformer of 750KVA चे installation.

या शटडाऊनमुळे लक्ष्मी नगर, धरमपेठ, गांधीबाग झोनचा तसेच मंगळवारी व हनुमान नगर झोनच्या काही भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

पाणीपुरवठा बाधित राहणारे झोन/ जलकुंभ:

लक्ष्मी नगर झोन:
लक्ष्मी नगर नवीन जलकुंभ, गायत्री नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, टाकली सीम जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ व जयताळा भाग (जयताळा व रमाबाई आंबेडकर नगर).

गांधीबाग झोन:
सीताबर्डी फोर्ट १ व २, बोरिया[पुरा/ खदान जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ.

धरमपेठ झोन:
राम नगर जलकुंभ: गोकुळपेठ, राम नगर, मरारटोली, तेलंगखेडी, तिलक नगर, भरत नगर, हिंदुस्थान कोलोनी, वर्मा लेआऊट, अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट, यशवंत नगर, हिल टोप, अंबाझरी स्लम, पांढराबोडी, संजय नगर, ट्रस्ट लेआऊट, मुन्जेबाबा स्लम, इ.

रायफल लाईन: सिव्हील लाईन्स, RTO कॉलोनी, धरमपेठ ९ गल्ली, गडगा, आंबेडकर नगर,

रामदासपेठ, काचीपुरा, ई.

फुटाळा लाईन: सिव्हील लाईन्स, दामोदर कॉलोनी, मरियम नगर, VCA स्टेडियम जवळचा

भाग, विधान भवन, ई.

सेमिनरी हिल्स जलकुंभावरील सुरेन्द्रगढ सप्लाय: सुरेन्द्रगढ , मानवता नगर, जय बजरंग

सोसायटी, सरोज नगर, मनोहर विहार, भीमटेकडी, धम्म नगर, राजीव नगर, गोंड मोहल्ला,

शास्त्री नगर, MES संप, MECL, CPWD, ई.

हनुमान नगर झोन:

चिंचभुवन जलकुंभ: नरेंद्र नगर भाग, बोरकुटे लेआऊट, म्हस्के लेआऊट, म्हाडा कॉलोनी, मनीष नगर भाग, जयदुर्गा सोसायटी (१ ते ६), शिल्पा सोसायटी (१ ते ४), नगर विकास सोसायटी, शाम नगर, सुरज सोसायटी, साई कृपा सोसायटी, कन्नमवर नगर, इंगोले नगर, PMG सोसायटी, मधुबन सोसायटी.

मंगळवारी झोन:
गिट्टीखदान जलकुंभ: बापू नगर, गीता नगर, बाबा फरीद नगर, गायत्री नगर, झिंगाबाई टाकळी वस्ती, साईबाबा कॉलोनी, फरस, डोये लेआऊट, मानकापूर, ताज नगर, रतन नगर, P&T कॉलोनी, सदिकाबाद कॉलोनी, जाफर नगर, अनंत नगर, भूपेश नगर,महेश नगर, बोरगाव रोड, पटेल नगर, उत्थान नगर, पलोटी नगर, अवस्थी नगर.

सेमिनरी हिल्स जुने जलकुंभ: CPWD क्वार्टर, काटोल रोड, पोलीस लाईन टाकळी, गड्डीगोदाम, खलासी लाईन, मोहन नगर.

येथे नमूद करावे लागेल कि, यादरम्यान पेन्च १, ३, पेंच ४ व कन्हान पूर्णपणे कार्यरत राहतील.
मनपा-OCWने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही.

Advertisement