कन्हान: पासून चार किलोमीटर अंतरावर असलेले गहुहिवरा गावी जनावरांची तृष्णा भागविण्याकरिता लोकसहभागातुन संजय सत्येकार शेतकरी नेते यांच्या हस्ते पूजा करून प्याऊचे उदघाटन करण्यात आले.
सध्या संपूर्ण राज्यात कडक उनाचा तडाखा सुरु आहे तापमान ४५ डिग्रिचा वर गेलेला आहे. हिच परिस्थिति नागपुर जिल्हाचीही आहे. बहुतांश नदी-नाले तलाव या वर्षी कोरडे पडले आहे. ज्यामुळे पशु पक्षीना प्यायला पाणी मिळणे कठीन झाले आहे. ज्यामुळे जनावरांचे खुप हाल होत आहे. या त्रासाचा विचार रेलवे मध्ये ड्राइवर असलेले मनोज बागडे यांना आला. या करिता काहीतरी करावे यास्तव त्यांनी गहुहिवरा येथे स्वय खर्चाने जनावरा (गुरे ढोरा) करिता प्याऊ सुरु करण्याचा विचार केला आणि त्याबदल संजय सत्येकार यांचा सोबत चर्चा केली आणि प्याऊची गर्ज लक्षात घेता सत्येकार यांनी सकारात्मक भूमिका दाखवत तात्काळ प्याऊ सुरु करण्याचे सूचवले असता गहुहिवरा गावात संजय सत्येकार यांच्या हस्ते उदघाटन करून प्याऊ सुरु करण्यात आला.
आलेल्या सर्वांचे आभार संयोजक मनोज बागडे यांनी व्यकत केले. प्याऊच्या शुभारंभा प्रसंगी प्रमुख उपस्थिति मा.विजय कठाळकर, पप्पू यादव,आशीष पाटील, कमल यादव, राजेश मरदाना, रोहित बागड़े, चंदूजी लक्षणे, प्रकाश गडे, संजय लुहरे, दुर्योधन ठाकरे, वसंतराव मसरे, रेकचंद मोजनकर,उत्तम चव्हाण, प्रकाश वासनिक, वसंतराव वैध आणि गावकरी उपस्थित होते.