Published On : Tue, Jul 27th, 2021

मनपा सेवेत ४१ वारसदारांना स्थायी नियुक्ती

Advertisement

– प्रतिकात्मक स्वरूपात तीन वारसदारांना महापौरांनी दिले पत्र

नागपूर : स्वच्छ, सुंदर नागपूर ही शहराची छबी कायम ठेवण्यासाठी सातत्याने स्वच्छतेचे सेवाकार्य बजावणा-या ४१ वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपामध्ये स्थायी नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. सोमवारी (ता.२६) महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रतिकात्मक स्वरूपात तीन वारसदारांना स्थायी नियुक्तीपत्र दिले. अन्य सफाई कर्मचा-यांना संबंधित झोन कार्यालयातून स्थायी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत.

Advertisement

महापौर कक्षामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत, नोडल अधिकारी गजेंद्र महल्ले, सहायक अधीक्षक किशोर मोटघरे, विशाल मेहता, नितीन कामडी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड आदी उपस्थित होते.

मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून सेवा देत असताना मृत्यू झालेले किंवा निवृत्त झालेले किंवा ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. अशा कर्मचा-यांच्या वारसदारांना मनपामध्ये स्थायी सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपातर्फे स्थायी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते अभिजीत मुकेश तिरमिले, अंकित राखभान भिमटे आणि संतोष कैलास तिरमिले या तीन वारसांना स्थायी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

स्थायी नियुक्ती पत्र प्राप्त वारसदार
आरती रंगा तोमस्कर, ममता राजकुमार तुर्केल, जयश्री मेवालाल मलिक, अनंत हिरालाल गोईकर, निखिल मुन्नाजी आदिवान, सोनू अविनाश बिरहा, साहिल आनंद डेलिकर, तुषार संजय तोमस्कर, ‌ऋषभ सुनील जनवारे, अथर्व सुजीत दुधे, अनिकेत अनिल तिलमले, रानो राजू मेश्राम, रिना महेश तांबे, कमलेश लक्ष्मण नन्हेट, रोशनी राहुल पांडे, मयुर जीवन समुद्रे, शुभम मनोज जुगेल, ज्योत्सना धम्मा वानखेडे, मौसमी भारत ढवळे, बबीता अशोक बकसरे, बादल हिरू गुदरिया, सरिता राम बमनेट, उमेश निलकंठ चंदनखेडे, दया अमित नक्षने, राहुल महादेव रंगारी, आरती प्रशांत खोब्रागडे, धीरज मनोहर समुंद्रे, शरद राजू समुंद्रे, सुलोचना राकेश सांडे, अभिजीत मुकेश तिरमिले, अनिल रामसिंग बक्सरे, पूनम नितीन जुगेल, श्रीकांत तुळशीराम गेडाम, पूनम अनूप सेवते, सुचेंद्र अशोक रामटेके, पूजा दीपक बेसरे, श्वेता भारत रोहनबाग, हर्षल अविनाश सहारे, अंकित रायभान भिमटे, संतोष कैलास तिरमिले, लक्ष्मी राजा बिरीया.