नागपूर: कोराडी येथील श्री जगदंबा देवस्थान परिसरात सुरु असलेल्या विकासकामांपैकी महावितरणतर्फ़े करण्यात येत असलेल्या भुमिगत वीज वाहिन्यांची कामे येत्या 15 दिवसांत पुर्ण करण्याच्या सुचना नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिले आहेत.
राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरादी येथील विकासकामांसाठी महावितरणला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असून महावितरणच्या 24.575 कोटींच्या या विकासकामांत 16 किमी लांबीची 33 केव्ही उच्चदाब भुमिगत वाहिनी टाकल्या जात असून 56.95 किमी लांबीची 11 केव्ही उच्चदाब भुमिगत वाहीनीही टाकल्या जात आहे. याशिवाय 74.1 किमी लांबीची लघुदाब भुमिगत वाहिनी तर 4.8 किमी लांबीचे वीजचोरीरोधक एरीअल बंच केबलही टाकली जात आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनात कोराडी येथील श्री जगदंबा देवस्थान परिसराला विकसित करण्यासाठी अनेक कामे सुरु असून त्यापैकी महावितरणलाही तेथील उपरी वीज वाहिन्यांचे रुपांतर भुमिगत वाहिन्यांमध्ये करावयाचे आहे, हे काम आता अंतिम टप्प्यात असून ते येत्या 15 दिवसात पुर्ण करण्याच्या सुचना दिलीप घुगल यांनी यापरिसराला भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेतेवेळी केल्या. यावेळी त्यांचेसमवेत अधीक्षक अभियंता पायाभुत आराखडा उमेश शहारे, अधीक्षक अभियंता नागपूर ग्रामिण नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता, सावनेर विभाग दत्तात्रय साळी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
बेसा-बेलतरोडी येथील वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली –
नवीन नागपूर म्हणून विकसित होत असलेल्या बेसा, बेलतरोडी आणि परिसरातील ग्राहकांची वीजपुरवठ्याबाबतची समस्या कायमस्वरूपी निकाली निघाली आहे. बेसा येथे नुकतेच 10 एमव्हीए क्षमतेची दोन रोहीत्र असलेल्या नवीन उपकेंद्राचे कार्यान्वयन करण्यात आले. या उपकेंद्रामुळे तेथील ग्राहकांना आता अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत मिळणार आहे. यापुर्वी या परिसराला लांब अंतरावरील मिहान येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा होत असे, बेसा ते मिहान या वीजवाहिनीचे अंतर अधिक याशिवाय मिहान येथील उपकेंद्रावरून वीजेची मागणी अधिक असल्याने अनेकदा ग्राहकांना वीज खंडित होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. तब्बल 200 ॲम्पीअरपर्यंतच्चा वीज भार या वाहीनीवर होता, मात्र न्यु बेसा येथे नवीन उपकेंद्र कार्यान्वित करून हा वीज भार बेलतरोडी, व्यंकटेशसिटी आणि स्वामी समर्थ अश्या तीन वाहिन्यांवर क्रमश: 80, 60 आणि 60 ॲम्पीअर असा विभागल्याने येथील वीजपुरवठ्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. याशिवाय या उपकेंद्रातून जगदंबा सोसायटी, हरिहरनगर आणि पद्मावती या तीन नवीन वाहिन्या उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात असून येत्या 15 दिवसांत या वाहिन्याही कार्यान्वित करण्याच्या सुचना मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिल्या आहेत.