जीप स्थायी समिती सदस्या अवंतिकाताई लेकुरवाडेची मांगणी
कामठी :-केंद्र सरकारने अचानकपणे केलेल्या कांदा निर्यातबंदी च्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तेव्हा केंद्र सरकारने लागू केलेल्या या निर्णयाचा कांग्रेस च्या वतीने निषेध करीत असून कांदा निर्यातबंदी तात्काळ कायमस्वरूपी उठविण्याची मागणी जिल्हा परिषद च्या स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी केले आहे.
टाळेबंदी निर्णयाचे परिणाम शेतीमालाच्या व्यवहारावर होऊन अक्षरशा शेतीमाल शेतातच सडून गेला आहे तेव्हा केंद्र सरकारने शेकऱ्यांच होणाऱ्या नुकसानीचा विचार केला नाही परंतु टाळेबंदीच्या काळात 60 ते 70 टक्के कांदा कांदा चाळीत सडल्याने बाजारात सध्या आवक कमी असल्याने कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये सरासरी भाव मिळत होता परंतु केंद्र सरकारने 14 सप्टेंबर रोजी अचानक कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्याने कांद्याचे भाव 700 ते 80 रुपया पर्यंत कोसळले आहेत तर केंद्र सरकारने केलेला हा प्रकार शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे तेव्हा सरकारने तात्काळ कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्याच्या हितार्थ कांग्रेस च्या वतीने प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी केली आहे.
– संदीप कांबळे , कामठी