Advertisement
नागपूर: कोव्हिडचा संकट काळात आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी अनेक कंपन्या भरभरुन मदत करीत आहे. नागपूरातील परसिस्टेंट सिस्टिमस लिमिटेड कंपनी तर्फे नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयांसाठी ३ व्हेंटीलेटर्स देण्यात आले.
महापौर श्री दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या वतीने उपायुक्त (महसूल) श्री. मिलिंद मेश्राम यांनी स्वीकार केले. श्री.मिलिंद मेश्राम यांनी कठिन काळात मनपाला मदत करण्यासाठी कंपनीचे आभार मानले. यावेळी श्री. संजय दहीकर उपस्थित होते.