मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या सुनावणीचे वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले आहे. त्याविरोधात आता ठाकरे गटातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार होती परंतु आता पुढची तारीख 6 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी 3 ऑक्टोबरला नाही आता पुढची तारीख 6 ऑक्टोबर असून याचिका सुनावणीस येणार का ? याची उत्सुकता अध्यक्षांनी जाहीर केलेलं वेळापत्रक सुप्रीम कोर्ट मान्य करतं का ? याचे उत्तर पुढच्या सुनावणीत मिळणार आहे. त्यामुळे ती कधी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.