Published On : Thu, Jun 4th, 2015

५ जून जागतिक पर्यावरण दिनी महानगरपालिका प्लास्टिक मुक्त नागपूर संकल्पना राबविणार

Advertisement


झोन स्तरावर विविध कार्यक्रम

NMC Envorment News photo 03 June 2015
नागपूर। पर्यावरणाचा होत असलेला ह्रास व त्याचे मानवी जीवनावर होनारे दुष्परिणाम लक्षात घेता दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार ५ जून २०१५ रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक झोन मध्ये पर्यावरण संवर्धना बाबत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने करावयाच्या पूर्व तयारीसाठी महापौरांनी ३ जून रोजी सकाळी महापौर कक्षात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीला उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, उपनेत्या नीता ठाकरे, नगरसेवक गोपाल बोहरे, ज्येष्ठ सदस्य सुनील अग्रवाल, बसपा पक्ष नेते गौतम पाटील, शिवसेना गटनेते किशोर कुमेरिया, अति. उपायुक्त प्रमोद भुसारी व जयंत दांडेगावकर, सहा. आयुक्त महेश मोरोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दारसवार सोबत सर्व झोन चे सहा आयुक्त उपस्थित होते. पर्यावरण दिना निमित्ताने सकाळी ११ ते १ राजे रघुजी भोसले (महाल टाऊन हॉल) येथे मनपा व ग्रीन व्हीजन फाउंडेशन संस्था संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांचे चर्चा सत्र आयोजित केले आहे.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगर पालिकेने मागील महिन्यांपासून मनपा पदाधिकारी-नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने श्रमदान करून अंबाझरी तलाव परीसरची स्वच्छता केली आहे. तथापि शहरातील गटरात व नाल्यामध्ये प्लास्टिक अडकून पडल्यामुळे नाल्या व गटारे तुंबतात तसेच हे प्लास्टिक नदी, नाले व तलाव यामध्ये वाहून जात असल्यामुळे व अविघटनशील असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे यावेळी पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना प्लास्टिक मुक्त नागपूर अशी ठरविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने झोन निहाय पर्यावरण दिन कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे.

झोन क्र. १ लक्ष्मीनगर :- सकाळी ७.०० ते १०.०० दिनदयाल नगर फ्रेंड्स को. ऑप सोसा. रिंग रोड नागपूर येथील मोकळ्या भूखंडावर असलेले प्लास्टिक व इतर टाकाऊ साहित्य उचलणे.  
झोन क्र. २ धरमपेठ :-  सकाळी ७.०० ते १०.०० अंबाझरी तलाव परिसरातील प्लास्टिक व टाकाऊ साहित्य उचलणे तसेच सकाळी १०.०० ते १२.०० सुदाम नगरी ट्रस्ट ले ऑउट कॅम्पस रोड तसेच सायंकाळी ६.०० ते ८.०० ट्राफिक चिल्ड्रेन पार्क येथील प्लास्टिक व टाकाऊ साहित्य उचलणे.
झोन क्र. २ हनुमाननगर :- सकाळी ७.०० ते १०.०० क्रीडा चौक ते मानेवाडा चौक ते बेसा चौक, क्रीडा चौक ते बैद्यनाथ चौक, बैद्यनाथ चौक ते अशोक परिसरातील प्लास्टिक व इतर टाकाऊ साहित्य उचलणे.
झोन क्र. २ धंतोली :- सकाळी ७.०० ते १०.०० यशवंत स्तेडीयम समोरील परिसरातील स्वच्छता अभियान व प्लास्टिक मुक्त झोन कार्यक्रम राबविणे.
झोन क्र. २ नेहरू नगर :- सकाळी ७.०० ते १०.०० रस्ते दुभाजकांवरील व परिसरातील प्लास्टिक व टाकाऊ पदार्थ उचलणे तसेच झोन बाजूला असलेल्या सुदामपुरी परिसरातील प्लास्टिक व टाकाऊ पदार्थ उचलणे तसेच झोनच्या बाजूला असलेल्या सुदाम नगरी परिसरातील १०० झाडे लावणे, येत्या पावसाळ्यात ५ हजार लावण्याचे झोन उद्दिष्ट आहे.          
झोन क्र. २ गांधीबाग :- सायंकाळी ५.०० वाजता कोतवाली चौक, महल बाजार, इतवारी गांधीबाग परिसरातील प्लास्टिक उचलणे, ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याबाबद नागरिकांना जागरूक करणे. तसेच झोनमधील सरकारी इमारती वरील रेनवाटर हॉर्वेस्टिंग कार्यक्रम हाती घेतला आहे.
झोन क्र. २ सतरंजीपुरा :- सकाळी ७.०० ते १०.०० राउत चौक त नाईक परिसरातील प्लास्टिक व टाकाऊ पदार्थ उचलणे व साफ सफाई, स्वंयसेवी संस्था चे सहकार्याने राबिविणे.
झोन क्र. २ लकडगंज :- सकाळी ७.०० ते १०.०० टेलिफोन एक्चेंज चौकात सुरुवात करून सिमेंट रोड वरील प्लास्टिक व टाकाऊ उचलणे. कचरा उचलणारे (राग पिच्कर्स) व कबाडीवाले यांना प्लास्टिक व टाकाऊ उचलण्यास प्रवृत्त करून परस्पर विल्हेवाट लावणे.    
झोन क्र. २ आशीनगर :- सकाळी ७.०० ते १०.०० इंदोरा मैदान व आयटीआय परिसरातील प्लास्टिक व टाकाऊ पदार्थ उचलणे व साफ सफाई, स्वंयसेवी संस्था च्या मदतीने रस्त्यावरील प्लास्टिक गोळा करणे.
झोन क्र. २ मंगळवारी :- सकाळी ७.०० ते १०.०० मंजीदाना कॉलनी काटोल रोड परिसरातील प्लास्टिक व टाकाऊ पदार्थ उचलणे.

वरील मोहिमे मध्ये नागरिकांचा सहभाग अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करून पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी हातभार लावावा असे महापौर प्रवीण दटके यांनी केले आहे.

Advertisement