नाभिक समाजावर आली उपासमारीची वेळ.
कामठी,: जागतिक महामारी कोविड-१९ मुळे संपूर्ण देश व महाराष्ट्राला सळो की पळो करून सोडले आहे. नाभिक समाज जाणे गेल्या तीन महिन्यांपासून शासनाच्या निर्देशानुसार आपली दुकाने बंद ठेवली आहेत. परंतु आज परिस्थिती हतबल झाली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय २३ मार्च पासून बंद झाल्याने मुलांचे शिक्षण, दुकानाचे भाडे, घरभाडे, वीजबिल, रोजचे दैनंदिन खर्च, घर खर्च व इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असले तरी नाभिक समाजाने शासनास सहकार्य करून आपले व्यवसाय आज पर्यंत बंद ठेवले आहे.
नाभिक एकता मंच च्या वतीने शासनास मागील दोन महिन्या पासून जिल्ह्यातील नाभिक एकता मंच च्या सर्व कार्यकारणी द्वारे निवेदन देऊन नाभिक सलून व्यवसायिकास मदत करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु शासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही.
नाभिक एकता मंच च्या वतीने वारंवार पत्र देवून शासनास स्मरण करुन देण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. त्या मध्ये शासनाने आमच्या मागणीचा विचार करून नाभिक सलून व्यवसायिकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी व आर्थिक मदत सुद्धा आज पर्यंत केली नाहीं. त्यामुळे आज गुरूवार (ता११.जून) रोजी संपुर्ण राज्यभर नाभिक एकता मंच च्या वतीने नाभिक समाज आपल्या व्यवसाय स्थळी मास्क , सोशलडिस्टनसिंग व शासनाने दिलेल्या सर्व नियमाचे पालन करीत मुक आंदोलन करुन कामठी तहसीलदार साहेबाना निवेदन देण्यात आले या मुक आंदोलनाला
नाभिक एकता मंच चे केंद्रीय महासचिव गजानन बोरकर, उपाध्यक्ष मनोज धानोरकर,शंकर चव्हाण, दिलिप खुरगे, गोपाल चव्हाण, दीपक जलवानिया,संजय लिंबाचिया, सुरेश बोपुलकर, सचिन अमृतकर, सुदाम चौधरी, विनोद वाट, सुरज फुलबांधे, बळवंत खुरगे, कपिल कळसकर,विशाल चन्ने,देवेंद्र फुलबांधे,प्रदीप श्रीवास, अजय श्रीवास,अंकित आस्कर, संजय सूर्यवंशी, सुनील ढोके, अशोक ढोके, शेखर चव्हाण,संतोष खुरगे, सूर्यकांत ढोके श्रीकांत ढोके, अमोल उके,आशिष श्रीवास, अजय नाग, अमोल चौधरी,राहुल फुलबांधे, श्रीमंत इंगळे सह मोठया संख्येने नाभिक एकता मंच चे सर्व पदाधिकारी व नाभिक बांधव सहभागी होते.
संदीप कांबळे कामठी