नागपूर : मनीष नगर अंडरपासवर वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अंडरब्रिजचा हा मार्ग वन व्हे असून देखील नियम ढाब्यावर चढवून याठिकाणी दोन्ही बाजूने वर्दळ कायम असते.त्यामुळे नागरिकांना अपघाताला तोंड द्यावे लागत आहे.
प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ‘नागपूर टूडे’ने डीसीपी चेतना तिडके यांच्याशी संवाद साधला.
सध्या सुरू असलेल्या समस्येला आळा घालण्यासाठी प्राधिकरण काय योजना आखत आहे, यासंदर्भात चेतना तिडके यांनी माहिती दिली. नागपूर वाहतूक विभागाकडून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड आकारण्यात येत आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहे. हा मार्ग वन व्हे असून नागरिकांच्या रहदारीकडेही आमचे आमचे कटाक्षाने लक्ष आहे.
दरम्यान मनीष नगर अंडरपासवर वाहतूक पोलिसांचा वचक संपल्यामुळे अनेक वाहनचालक सिग्नलचे पालन करीत नसल्याची तक्रार आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑटोचालक रस्त्याच्या मधोमध ऑटो थांबवून प्रवासी भरतात. थांबा नसलेल्या ठिकाणी रस्त्यावरच बस उभी करून खासगी बसचालक प्रवासी घेतात आणि उतरवतात. पोलीस असतानाही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत.