Published On : Sun, Mar 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

पंतप्रधान मोदींची दीक्षाभूमीला भेट; भगवान गौतम बुद्धांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन!

Advertisement

नागपूर : हिंदू नववर्ष, गुढी पाडव्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज रविवार, ३० मार्च रोजी सकाळी ८.४० वाजता नागपुरात दाखल झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर मोदी दीक्षाभूमीकडे रवाना झाले दीक्षाभूमीवर पोहोचल्यानंतर यावेळी मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करत आदरांजली वाहिली केली. तसेच भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केले.
नागपूरच्या दीक्षाभूमी स्तूप येथे डॉ. आंबेडकरांनी १९५६ मध्ये त्यांच्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.

दरम्यान नागपूर भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी व सोलार डिफेन्स, एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते हिंगणा मार्गावरील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. ‘अनमॅन्ड एरियल व्हेईकल्स’साठी १,२५० मीटर लांबीची धावपट्टी सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement