पहिल्याच दिवशी सुमारे २३,००० पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास
नागपूर: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पुणे मेट्रो प्रकल्प आणि त्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन केले. प्रकल्पाचे उदघाटन झाल्यावर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात मेट्रो सेवेला रीतसर सुरवात झाली. “पुण्यात आजपासून आंतरराष्ट्रीय दर्ज्याची मेट्रो सेवा सुरु होत असल्याबद्दल आनंद होत आहे. पुण्यामध्ये नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरण अनुकूल, शहरी वाहतूक साधन उपलब्ध होत आहे. मी सर्व पुणेकरांना मेट्रोची सेवा सुरु झाल्याबद्दल अभिनंदन करत आहे,“ हा संदेश माननीय पंतप्रधान श्री मोदी यांनी जनतेला व्हिजिटर बुक मध्ये लिहित जनतेला दिला.
मा. पंतप्रधान यांनी गरवारे स्थानक येथे पुणे मेट्रो प्रकल्प उदघाटना साठीची कोनशिलाचे लोकार्पण केले, याप्रांसगी तरी. राज्यपाल भगतसिंग कोशियारी, उपमूख्यमंत्री अजित पवार, फ्रेंच राजदूत श्री. युगो अस्तोतु (Ugo Astuto), पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर श्री. माई ढोरे, एएफडीचे भारतातील मुख्याधिकारी श्री. ब्रुनो इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन झाल्यावर दुपारी ३ वाजता प्रवासी सेवा सुरु झाली आणी पहिल्याच दिवशी सुमारे २३,००० पुणेकरांनी प्रवास केला. दुपार्री ३ ते रात्री ८.३० वाजे पर्यंत मेट्रो सेवा सुरु होती, म्हणजे पाह्लीया दिवशी केवळ ५.३० तासाच्या कालावधीत पुणेकरांनी मेट्रो प्रवासाचा हा विक्रम नोंदवला. इतक्या मोठ्या संख्येने प्रवास करत पुणेकरांनी आपल्या शहरात मेट्रो सेवेची किती गरज आहे हे दाखवून दिले.
या आधी उद्घाटनाच्या सोहळ्या दरम्यान पंतप्रधान यांनी “ड्रीम कमिंग ट्रू” या प्रदर्शनाचे अवलोकन केले. या प्रदर्शनी पुणे मेट्रो प्रकल्पाचे संपूर्ण प्रारूप (मॉडेल) तसेच पुणे मेट्रो प्रकल्पाचे विविध वैशिट्ये यांची माहिती प्रदर्शित केलीय होती.
त्यात मुख्यते सोलर ऊर्जा, झाडांचे पुनर्रोपण, अत्याधुनिक ५ DBM प्रणाली, मेट्रो निओ, रूट बॉल तंत्रज्ञान, अद्वितीय असे स्टेशनचे डिझाइन पुणे मेट्रो भूमिगत स्थानकाची वैशिट्ये (पुणे मेट्रोचे सिविल कोर्ट भूमिगत स्थानक ३३ मी जामीनीखाली असून ते भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानकांपैकी एक आहे) स्वारगेट मल्टीमॉडेल वजनाने हलके, अल्युमिनियम धातूने निर्मित भारतात पाहिल्यांदाच वापरण्यात येणारी ट्रेन, वनाज येथील कचरा डेपोचे मेट्रो कार डेपोमध्ये केलेले परिवर्तन, फर्स्ट माईल- लास्ट माईल काँनेक्टिव्हिटी, ६० % पेक्षा जास्त नॉन फेअर बॉक्स रेव्हनूर ई विषय दर्शवले आहे.
प्रदर्शनीच्या अवलोकांनंतर मुख्य अतिथीने गरवारे स्थानकातून फ्लॅटफॉर्म वर जाऊन सिग्नलची बटन दाबले व मेट्रोच्या सिग्नल हिरवा झाला त्यांनतर हिरवा झेंडा दाखवून उदघाटनाची पहिल्या ट्रेनने हिरवा झेंडा दाखवला. गरवारे स्थानकातून मेट्रो मध्ये मा. पंतप्रधान यांनी दिव्यांग विद्यार्थ्यंशी संवाद साधला. तसेच प्रदर्शनीचे अवलोकन केल्यानंतर मा. पंतप्रधान यांनी मोबाइल QR कोडे द्वारे पैसे देऊन मेट्रो तिकीट घेतले.
गरवारे ते वनाज आणि पीसीएमसी ते फुगेवाडी या दोन मार्गिके मध्ये पाहिल्यांदाच ट्रेन धावली. पीसीएमसी ते फुगेवाडी हा ७ किमी व ५ स्थानक असले ला मार्ग आणि वनाज ते गरवारे हा ५ किमी व ५ स्थानक असलेला मार्गाचे लोकार्पण आज करण्यात आले.
पुणे मेट्रोची सेवा पीसीएमसी ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे या मार्गावर आजपासून सुरु झाली असून सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत हि सेवा सुरु राहील दार अर्ध्या तासांनी ट्रेनची सेवा असेल. कमीत कमी तिकीट दर १० रु असून जास्तीत जास्त दर २० रु असणार आहे. परतीचे तिकीट ३० रु ला असणार आहे.