Advertisement
मुंबई:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज एकदिवसीय मुंबई दौ-यावर आहेत. सकाळी १० वाजता त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथे आगमन झाले.
राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार तथा भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, आमदार आशिष शेलार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, तिन्ही दलाचे प्रमुख अधिकारी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते.