महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांनी दिली कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे भेट .
रामटेक : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे वार्ताहर परिषद सोहळा पार पडला.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा उदय सामंत , आमदार आशीष जयस्वाल , कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ चे कुलगुरू मा. आचार्य श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रो .विजयकुमार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.गेल्या काही दिवसांपासून मा तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठाचा दौरा करीत आहेत.सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिला आहे.
तर अश्या या कोरोना च्यया काळामध्ये विद्यार्थ्यांना घरा बाहेर न पडता आपल्या घरूनच ऑनलाइन च्या माध्यमातून परीक्षा कशी देता येईल यावरती मुख्य चर्चा झाली. विद्यापीठाद्वारे सुरू असलेल्या परीक्षेच्या कामाचे ही कौतुक केले. संस्कृत विद्यापीठ द्वारे 1 हजार 225 विद्यार्थी 1 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान ऑनलाईन परीक्षा होणार आहे. अंतिम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना अडचणी येतील त्यांची त्या जिल्ह्यातील केंद्रावर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल.
एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही , याची दक्षता विद्यापीठांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
परीक्षा घेताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडविण्याची शासनाची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र शासन यांनी आज रामटेक येथे संस्कृत विश्वविद्यालय येथे कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी रामटेक युवा सेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे रामटेक विधानसभा क्षेत्र आमदार आशीष जयस्वाल, जिल्हा परीषद सदस्य संजय झाडे, युवासेनाचे उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणागत शहर प्रमुख, शिवसेना धर्मेंश भागलकर, सरपंच शीतलवाड़ी मदन सावरकर, ग्राम पंचायत, विनोद सावरकर, यांनी स्वागत केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांनी भेट दिली.
दरम्यान पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय उदय सामंत यांचाशी चर्चा करुन त्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या .
पत्रकारांच्या वार्तालाप प्रसंगी त्यांनी प्रेमाने व शांततेत उत्तर दिले.
यावेळी रामटेक चे आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्री महोदय उदय सामंत यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्कृत विद्यापीठ च्या पी.आर.ओ. रेणुका बोकारे व स्टाफ ने प्रयत्न केले.