रामटेक :दि 26/12/2019 वेळ 9:40रामटेक वरून 11 किमी नेरला गावकरी अमोल मनोहर दुर्ग हे सकाळी घराच्या बाजूला असलेल्या विहिरी मध्ये पाणी काळासाठी निघाले जवळ जाताच विहिरीमध्ये लक्ष गेली व पाहताच एक मोठा नाग त्यांना विहिरीमध्ये दिसला व त्यांनी हे सूचना आजूबाजूचा घरच्या लोकांना सांगितले व त्वरित रामटेक सर्पमित्र व प्राणी मित्राचे चे नंबर काढून वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन अध्यक्ष राहुल कोठेकर यांना संपर्क केला
व घटनेची माहिती सांगितली की आमच्या घराच्या बाजूला घरच्या विहिरीमध्ये एक मोठा नाग पडलेला आहे व त्या नाग सापाला बाहेर काढण्यासाठी मदत करावी त्वरित सर्प मित्र प्राणी मित्र राहुल कोठेकर व अजय मेहरकुळे रामटेक* *वरून अकरा किलोमीटर नेरला गावात साप रेस्क्यू साठी निघाले नेरल्या गावात घटनास्थळ वर पोहोचल्यानंतर पहिले की एक मोठा विषारी नाग विहिरी मध्ये पडलेला होता
त्या सापाला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमलेली होती गर्दीला बाजूला करून सापला रेस्क्यू ला सुरुवात केले विहिरीमध्ये उतरण्यासाठी काहीही साहित्य नव्हते मग एका टोपली ला रस्सा बांधून विहिरीमध्ये टाकण्यात आले व त्या सापाला बाहेर काढून सुखरूप पकडण्यात आले एका प्लास्टिकच्या भरणी मध्ये बंद करण्यात आले व गावकऱ्यांना सापाची माहिती देऊन स्टेट पंचनामा करून सापाला सुखरूप जंगलात सोडण्यात आले*