नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना सुरुवात झाली आहे.राज्यभरात पोलिसांचा काडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि इतर दलातील कर्मचाऱ्यांनाही मतदान करता यावे, यासाठी शुक्रवारी शहरभरातील ४० बुथवर मतदान पार पडले. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी शुक्रवारी थेट आढावा घेतला.
विशेषतः सेंट उर्सुला शाळेत ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या विशेष सुरक्षा व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.
मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करणे, शांतता आणि सुरक्षा, पोलिसांकडून दळणवळणाच्या साधनांचा वापर, सीसीटीव्ही कॅमेरे, संवेदनशील आणि धोकादायक बूथवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करणे यासारख्या विशेष खबरदारीचे मूल्यांकन करण्यात आले. तसेच आवश्यक असल्यास, तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे सिंगल म्हणाले.