कामठी :-सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगुण जनसामान्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते पोलीस दादा ही जवाबदारी योग्यरीत्या सांभाळत असले तरी बहुधा पोलिसांवर टीकेची झोड असते मात्र पोलीसदादा हा ही एक माणूसच आहे त्याला ही सामाजिक बांधिलकी आहे याचं सामाजिक बंधीलकीतून एका पोलीस शिपायाला गस्त दरम्यान नगदी 2800 रुपये व इतर महत्वपूर्ण दस्तावेज मधील पॅंन कार्ड, आधार कार्ड, लायसेन्स आदींनी भरलेला एक पर्स आढळला असता त्या इसमाचा शोध लावोत त्याला पोलीस स्टेशन ला बोलावून सापडलेला पर्स सुपूर्द करण्यात आला.या कार्यशैलीतून माणुसकीचा परिचय देणाऱ्या पोलीस नाईक(शिपाई) चे नाव नामदेव टेकाम असे आहे.
प्राप्त माहितीनुसार परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणारया गुन्हे शाखा विभागातील पोलीस पथक हे आज दुपारी 12 दरम्यान गस्तीवर फिरकत असता नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रणाळा येथील साबळे पेट्रोलपंप समोर पैस्याणे भरलेला एक पर्स सापडला त्या पर्सची पाहणी केली असता पर्स मध्ये 2800 रुपये नगदी व इतर दस्तावेज होते.
त्यातील आधार कार्ड वरून हा पर्स कामठी येथील बी बी कॉलोनी रहिवासी मोहत्तसीम अन्सारी रशीद अन्सारी चे असल्याचे लक्षात येताच त्याचा व्हाट्सएप वा इतर ठिकाणी माहिती शेअर करन्यात आली दरम्यान आधारकार्ड वरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून त्याला गुन्हे शाखा कार्यालय मध्ये बोलावून सापडलेले पर्स योग्यरीत्या सुपूर्द करण्यात आले.यावेळी पर्स मालक असलेले मोहत्तसीम अन्सारी हे क्रिकेट कोच असून नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात क्रिकेट कोच म्हणून कार्यरत असल्याची माहिती दिली तर पर्स मिळाल्याबद्दल पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी पोलीस नाईक नामदेव टेकाम, एपीआय अनिल मेश्राम, पीएसआय मिश्रा,पीएसआय भलावी, पो हवा राजेश यादव, मंगेश लोंडे,अजय बघेल, प्रीतम ठाकूर, उत्कर्ष राऊत आदीं उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी