Published On : Tue, Aug 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी घेतली शहरातील बांधकाम व्यावसायिकांची आढावा बैठक

Advertisement

nagpur policeनागपूर: शहरात अद्यापही ठिकठिकाणी रस्ते दुरुस्ती, सिमेंटीकरण, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या अर्धवट सोडलेल्या बांधकामांमुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी पोलीस भवन येथे शहरातील बांधकाम व्यावसायिकांची आढावा बैठक घेतली. यादरम्यान आयुक्तांनी व्यावसायिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

बांधकाम व्यावसायिकांनी कोणतेही काम करण्याच्या अगोदर पोलीसांना सबंधित कामाबाबत पूर्व सूचना देवून कामासंबंधी सर्व तपशिल दिला पाहीजे. जेणे करून पोलीसांना वाहतुकीसंबंधीत योग्य नियोजन करता येईल, रस्त्याचे बांधकाम करतांना व्यावसायिकांनी संबंधीत काम किती दिवसात पूर्ण होईल. त्यांच्या नावाछा पत्ता व मोबाईल क्रमांक दर्शनिय भागात फलकावर लावण्यात यावा, तसेच काम सुरू असतांना व्यावसायिकांनी योग्य ते मार्शल नेमुण वाहतूक सुरळीत करावी. पावसामुळे लोकांना त्रास होउ नये याकरीता रस्त्यावर असलेले खड्‌डे बुजविण्यात यावे. ज्या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी नागरीक आपले वाहन पार्कीग करतात ते गार्ड मार्फत काढण्यात यावे. तसेच व्यावसायिकांनी दिवस व रात्रीचे कामकाजाची योग्य विभागणी करावी.

नागपूर शहरातील सर्वसामान्य जनतेस वाहतुकीसंबंधी होणारा त्रास कमी व्हावा याकरीता आयुक्तांनी वरील प्रमाणे सूचना व्यावसायिकांना दिल्या.जे व्यावसायिक सुचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सिंगल यांनी सांगितले.

Advertisement