Advertisement
नागपूर : नागपूर पोलीस मुख्यालयात (मुख्यालय) कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल विक्रम सिंग (वय 31 ) यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
माहितीनुसार, सिंग हे फ्रेंड्स कॉलनीतील नर्मदा कॉलनीत राहतात. ते सकाळी मॉर्निग वॉक करून घरी परतल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर काही कळण्याच्या आतच ते जमिनीवर कोसळले.
त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.