नागपूर: भरधाव वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात घरी परत जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा म्रुत्यु झाला आहे.ही घटना शुक्रवारी मध्यरात्री नंतर शांतीनगर रेल्वे स्टेशन पासून थोड्या अंतरावर घडली आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलीस कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
विशाल वसंत मानकर वय 32 वर्ष रा. विनोबा भावे नगर असे अपघातात म्रुत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.ते लकडगंज पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस होते.
विशाल शुक्रवारी मध्यरात्री नंतर 12.ते 1 वाजताच्या सुमारास रेल्वेस्टेशन समोरील रोडने आपल्या मोटरसायकलने घरी परत जात होते. वाटेत रतन टावर जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
यात ते खाली फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर वाहन चालक पळून गेला. यामुळे ते बराच वेळ जखमी अवस्थेत घटनास्थळावर पडून होते.वेळीच औषधोपचार होऊ न शकल्याने त्यांंचा जागीच म्रुत्यु झाला. या भागात रात्री 1 ते 1.30 वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या चार्ली पथकास ते जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले. त्यांना तात्काळ हास्पिटल मध्ये भरती केले असता ,डॉक्टरांनी तपासणी दरम्यान म्रुत घोषित केले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस तपास करीत आहे. विशाल यांची शुक्रवारी साप्ताहिक सुटी होती. असे सांगण्यात येते.