नवी दिल्ली : पोलिसांनी देहव्यापार करणाऱ्या महिलांशी सन्मानाने वागले पाहिजे, आदेश सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा क्रूर आणि हिंसक असतो,अशी गंभीर टिप्पणीही न्यायालयाने केली आहे. संग्राम संस्थेच्या संचालिका मीना शेषू यांनी ही माहिती दिली.
पोलिस आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना लैंगिक कामगारांच्या हक्कांबद्दल संवेदनशील केले पाहिजे. लैंगिक कामगारांनादेखील सर्व मूलभूत मानवी हक्क आणि राज्यघटनेने सर्व नागरिकांना हमी दिलेले इतर अधिकार देखील आहेत. त्यांचा शाब्दिक आणि शारीरिक गैरवापर करू नये, त्यांच्यावर हिंसाचार करू नये किंवा त्यांना कोणत्याही लैंगिक कृत्यासाठी जबरदस्ती करू नये. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या कोणत्याही सेक्स वर्करला तत्काळ वैद्यकीय सोयी आणि साहाय्याबरोबरच लैंगिक अत्याचारातून वाचलेल्या सेक्स वर्कर महिलेला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी १९ मे रोजी लैंगिक कामगारांच्या अधिकारांच्या बाबतीत निर्देश जारी केले आहेत. गेल्या १० वर्षांपासून बुद्धदेव कर्मास्कर विरुद्ध भारत सरकार हे प्रकरण चालू आहे. सर्व सेक्स वर्कर्सना संविधानानुसार सन्मानाचे जीवन कसे जगता येईल यावर शिफारशी देण्यासाठी न्यायालयाने एक पॅनल स्थापन केले.