नागपूर : स्वातंत्र्यदिन पोलीस स्टेशनमध्ये डान्स केल्याप्रकरणी निलंबित तहसील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांच्या पदावर रुजू करण्यात आले आहे. पुनर्स्थापनेनंतर त्यांची केवळ तहसील पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यानंतर तहसील पोलिस ठाण्याच्या आवारात ‘खायिके पान बनारस वाला’ या गाण्यावर डान्स केला. यासंदर्भतील व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यात एएसआय संजय पाटणकर, कर्मचारी अब्दुल कयूम गनी, भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी हे पोलीस कर्मचारी डान्स करताना दिसत आहेत.अनेक लोकांनी पोलिसांच्या डान्स स्टेपचे कौतुक केले. दरम्यान, क्लिपिंग पाहिल्यानंतर मुंबईत बसलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा राग गगनाला भिडला होता.
त्यांच्या सूचनेवरून चारही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले. पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास झोन-3चे डीसीपी निमित गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला.
तपासाअंती या पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा तहसील पोलीस ठाण्यात रुजू करून घेण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण होते.