नागपूर : शहरात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून त्याची सर्रास विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाई गोवंशाचे ८०० किलो मास, गुराढोरांसह, कापून विक्री करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोघांना अटक केली असून नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस प्रशासनासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करण्यात आली.
शहरातील महेबूब पुरा येथील नागरिकांनी महबूब पुरा खाटीक गल्ली येथील अवैध कत्तलखान्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.त्यामुळे नागरिकांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
याची गंभीर दखल घेत पोलिसांनी पालिका मुख्याधिकारी, न. प. कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांच्या सहभागाने खाटीक गल्ली येथे छापा टाकला.
जनावराचे मास ८०० किलो, लोखंडी सुरे ६ नग, चार नग लोखंडी कुऱ्हाडी, एक मोठा व दोन लहान तराजू वजन काटे, लोखंडी वजन मापे, दोन गोल लाकडी ठोकळे व चौदा जनावरे असा एकूण साहित्य निर्दयपणे कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आले होते.