– दोन आरोपीसह २ लाख ३८ हजा र ५९० रू. चा मुद्देमाल जप्त
पारशिवनी : – पारशिवनी तालुक्यातिल माहुली -मनसर रोड ,अग्रवाल नर्सरी जवळ मौजा हेटी शिवारात कवठा नाला येथे गावठी मोहफुल दारूची हातभट्टी लावु न दारू काढत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पारशिवनी पोलीसानी धाड मारून दोन आरोपीसह २ लाख ३८ हजार ५९० रूपयाचा मुद्देमाल पकडुन कारवाई केली.
शनिवार (दि.२४) अप्रैल ला दुपारी २ वा. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीती वरून पारीशवनी पोलिस स्टेशन चा पोलिस उप निरिक्षक संदिपान उबाळे, पोलिस मुदस्सर जमाल, संदिप कडु ,महेंन्द्र जाळीतकर पँट्रोलिगा करित असताना गुप्त माहीती मिळालयाने पारशिवनी पोलिस माहुली रोड येथिल हेटी शिवारात कवठा नालात लागुन गावठी मोहफुल दारूची हातभट्टी लावुन दारू काढत असताना दिसुन आल्याने एक आरोपी पळुन लागल्याने पारशीवनी पोलीसानी त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन सुरू हातभट्टी जवळुन गावठी मोहफुल दारू २२० लिटर किमत १लाख १० हजार रू व ५०० लिटर मोहफुल सळवा किमत १ लाख रूपये , दोन मोठे प्लास्टिक कँन मध्ये मोहफुल दारूगाळताना मिळ्न आल्याने त्या ठिकाणी दारू गाळ०याचे साहीत्य , एक जर्मन गोल घमेला सारखा डेचकी पात्र एक , एक प्लास्टिक नळी अशा ८ हजार ५९० रूपयाचा सह एकूण २लाख ३८ह्जार,५९०रूपये चा मुद्देमालासह आरोपी (१)संदिप हरिदास मडावी,वय ४२वर्ष,राहणार मनसर, आरोपी(२)शुभम श्रीराम घोडेस्वार ,वय २४वर्ष, राहणार मनसर यास कलम ६५ ((सि)(ई)(फ) ८३ मुंदाका नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही अरोपिनाअटक केली. ही कार्यवाही पारशिवनी पोलीस स्टेशनचे थानेदार संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरिक्षाक संदिपान उबाळे , पो सि संदिप कडु , मुद्देस्सर जमाल, महेंन्द्र जाळीतकर यांनी आदीने सहभागी होऊन कामगीरी बजावली.