सात जणांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : हाऊस ऑफ हेल कॅफे येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा शुक्रवारी रात्री बजाजनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाई अंतर्गत पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.अजहर रफीक शेख ( वय 38 वर्षे रा. घटाटे बिल्डींब ब्लॉक नं पो.स्टे 3, केअर हॉस्पीटल जवळ रामदासपेठ), रेहान नेगी (वय 30 वर्षे रा. ए.जी.ओ ऑफीस बिल्डींग सिव्हील लाईन),मनीकंटा रेडडी (वय 23 वर्षे रा. इच्छापुरम आंद्रप्रदेश ह.मु. व्ही.एन.आय.टी कॉलेज), चेतन रेडडी (वय 19 वर्षे रा. सितारामा पुरम आंद्रप्रदेश ह.मु. व्ही.एन.आय.टी कॉलेज),विरबोयना आदीत्य वर्धन (वय 19 वर्षे रा. विवेकानंद नगर कॉलनी हेद्राबाद तेलंगणा ह.मु. व्ही.एन.आय.टी कॉलेज), शुभम प्रकाश उईके (वय 30 वर्षे रा. प्लॉट नं 72, ओमकार नगर हेडेक्स ऑफीस जवळ),सोनीक विलास विधायतकर (वय 27 वर्षे रा. मधुरा किराणा जवळ पांढरा बोडी) अशी सात आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून 17,580 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 17 ऑक्टोबर आणि शनिवार, 18 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अधिकाऱ्यांना बजाज नगर स्क्वेअर येथे असलेल्या हाऊस ऑफ हेल कॅफेमध्ये हुक्का पार्लर चालवल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर, पोलिसांनी परिसरात छापा टाकला यादरम्यान सात व्यक्ती अवैधरित्या हुक्क्याचा आस्वाद घेत असल्याचे आढळले. पोलीसांनी आरोपींवर BNS च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.