नागपूर – कळमेश्वर येथील अंबिका फार्म येथील सुकून व्हिला हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अवैधरित्या दारू व हुक्का पार्टी सुरू होती. या पार्टीत तरुण-तरुणींचा सहभाग होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना या पार्टीविषयी गुप्त माहिती मिळाली.त्यानंतर : कारवाईदरम्यान आरोपी दिपेश गंगाराम पशुपुलवार (२७), रोशन किशन मस्ते (२६, रा. मंगळवारी सदर, नागपूर आणि तन्मय कैलास केवलरामानी (१९, रा. जरीपटका नागपूर) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून ३७ हजार रुपये किमतीच्या विदेशी बनावट दारूच्या बाटल्या, हुक्क्याचे भांडे, हुक्का पिण्याचे साहित्य, विविध फ्लेवर्स आणि सुमारे ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला.
आरोपींना कळमेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, राजीव करमलवार, एएसआय चंद्रशेखर घाडेकर, हवालदार प्रमोद तभाने, दिनेश आधापुरे, मिलिंद नांदूरकर, अमृत किनगे, आशुतोष लांजेवार यांनी कारवाई केली.