जुनी कामठी पोलिसानी दिले 5 गोवंश जनावरांना जीवनदान
कामठी :-कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठी कामठी शहरात लॉकडाऊन सुरू आहे.
तरी सुद्धा गुप्तचर पद्धतीने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच जुनी कामठी पोलिसानी त्वरित सापळा रचून कमसरो बाजार मार्गातून भाजिमंडी कडे झेनॉन पिकअप वाहन क्र एम एच 49 डी 0948 ने अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर धाड घालण्यात यशस्वी झाल्याची कारवाही सकाळी 1 0 दरम्यान केली असून या धाडीतून जप्त झेनॉन वाहन किमती 4 लक्ष 50 हजार रुपये व जप्त 5 गोवंश जनावरे किमती 75 हजार रुपये असा एकूण 5 लक्ष 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत जप्त गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून गोवंश जनावरांना जीवनदान देत पसार आरोपी वाहनचालक व माल मालक विरुद्ध गुन्हा नोंदवोण्यात आला .
ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोत्पल , एसीपी राजरतन बन्सोड यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, दुय्यम पोलीस निरीक्षक बलीरामसिंग परदेसी, डी बी स्कॉड चे धर्मेंद्र राऊत, पंकज भारसिंगे, महेश कठाने यानो केली असून पुढील तपास सुरू आहे
संदीप कांबळे कामठी