Advertisement
नागपूर: सक्करदरा हद्दीतील मोठा ताजबाग येथे सुरू असलेल्या हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या १०२ व्या उर्स निमित्ताने उद्या २ ऑगस्ट रोजी शाही संदलचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीर कोणताही अनुचित प्रकार घडू म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र यांच्या नेतृत्वात पायी मार्च काढण्यात आला. तसेच यादरम्यान पोलीस आयुक्तांनी बंदोबस्त आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. आयुक्तांनी मोठा ताजबाग, बुलंद गेट येथून दर्गा मेन गेट पर्यंत पायदळ रूट मार्च काढला. सिंगल यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना शाही संदल दरम्यान सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. या मार्च मध्ये अपर पो. आयुक्त सर, गुन्हे शाखा, अपर पो. आयुक्त दक्षिण विभाग, पो. उपायुक्त परि. क्र. ०३, ०४ आणि वाहतूक विभाग, सहा. पो. आयुक्त सहभागी झाले होते.