नागपूर : महाराष्ट्रातील नागपूर आणि रामटेक लोकसभा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे, त्याआधी मतदान केंद्रात आवश्यक असलेल्या सर्व साहित्यासह ईव्हीएम मशिनचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आले. नागपुरातील बचत भवनात या साहित्याचे वाटप करण्यात आले. जेथून मोठ्या संख्येने कर्मचारी निवडणूक साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनाही बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
दरम्यान रामटेक लोकसभा मतदारसंघात 2405 मतदान केंद्रे आहेत, तर नागपूर लोकसभा मतदारसंघात 2105 मतदान केंद्रे आहेत.