Published On : Thu, Feb 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

पूनम पांडेला मृत्यूची अफवा पसरवणे आले अंगलट; भारत सरकारकडून सडेतोड उत्तर

Advertisement

नागपूर :मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ उडाली होती. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही ही माहिती देण्यात आली होती. पण तिच्या मृत्यूचं वृत्त खोटं असल्याचं समोर आलं. तिने स्वत:च समोर येत आपण जिवंत असल्याचे सांगितले.सर्विकल कॅन्सर जनजागृतीसाठी आपण हे पाऊल उचलल्याचे पूनम पांडेने म्हटले होते.

यानंतर युझर्सनी संताप व्यक्त केला तसेच तिच्यावर कारवाईची मागणी केली. केंद्र सरकार पूनम पांडेला सर्विकल कॅन्सर जनजागृती मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडर बनवू शकते अशीही चर्चा होती. मात्र या सर्व चर्चांवर भारत सरकारने मौन सोडलं असून पूनमला सणसणीत उत्तर दिले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, “गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेच्या ब्रँड ॲम्बेसेडरशिपसाठी अभिनेत्री पूनम पांडेच्या नावाचा कोणताही विचार केला जात नाही.” त्यामुळे पूनम पांडेने केलेला स्टंट तिच्या अंगलट आल्याचं दिसत असून तिने भारत सरकारची सर्विकल जनजागृती मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडरशिपची ऑफर गमावली असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement