जिलाधिकारिसोबत घेतली भेट
नागपुर– कोरोना बंदीमध्ये नागपूरच्या सर्व गोरगरीब जनतेला राशन दुकानातून मोफत धान्य मिळण्याकरिता आज बुधवार दि १ एप्रिल रोजी नागपुर चे माननीय जिल्हाधिकारी श्री ठाकरे साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
रॅशनधारकांना मोदीजींनी जाहीर केल्यानुसार प्रत्येकी ५ किलो प्रमाणे ३ महिन्याचे १५ किलो राशन मोफत दिले पाहिजे होते पण राशन दुकानदार पैसे घेऊन राशन देत आहेत.
तसेच ज्यांचे राशन कार्डावर मागील काही महिन्यात धान्य न घेतल्याने बंद करण्यात आले, अश्या नागरिकांना सुध्दा या आणीबाणीच्या काळात ३ महिन्याचे धान्य देण्यात यावे . तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे जे कामगार कामासाठी नागपूरला आले व त्यांच्याजवळ राशन कार्ड नाही आहे अश्या लोकांना सुद्धा ३ महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, अश्या प्रकारच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या असे निवेदन राज्य सरकारला जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून करण्यात आले.
जिल्हाधिकारी साहेबांनी रेशनकार्ड नसणाऱ्यांनी आपल्या जवळच्या राशन दुकानात धान्यासाठी अर्ज करावा असे सांगण्यात आले व लवकरच या सर्व गोष्टींची दखल घेऊन मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिले .