नागपूर : मागील १५ दिवसांपासून नागपूरसह विदर्भात पाऊसाने दडी मारली होती. हवामानात तापमान वाढल्याने उकाडा निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते.तसेच बळीराजाचीही संकटात सापडला. १८ ऑगस्टपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने येलाे अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान खनून आणि लान वादळांचा प्रभाव ओसरल्यानंतर बंगालच्या उपसागरात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. ते दक्षिणेकडे वळत आहे. शिवाय उत्तरप्रदेश व आसपासच्या क्षेत्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशनसह दक्षिण कर्नाटकमध्ये तयार होत आहे.
या प्रभावाने विदर्भात १८ ते २१ ऑगस्टदरम्यान काही ठिकाणी जाेरदार ते अतिजाेरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने दिला आहे. त्यानंतरही पावसाळी ढग कायम राहणार असण्याची शक्यता आहे. मात्र ही दिलासादायक स्थिती केवळ विदर्भातच राहणार आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात या काळात ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे.