Published On : Fri, Aug 20th, 2021
By Nagpur Today Nagpur News

प्रत्येक झोन मध्ये पोटोबा फुडस्टॉल उघडणार : धुरडे

Advertisement

जागेची केली पाहणी

नागपूर : समाजकल्याण विभागातर्फे झोन क्र. १ ते १० मधे पोटोबा फुड स्टॉल महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरु करण्याकरीता तथा पोटोबा फुड स्टॉल करीता झोन कार्यालतर्फे निर्धारित केलेल्या जागेची पाहणी करण्याकरीता सभापती महिला व बालकल्याण समिती श्रीमती दिव्या धुरडे तसेच उपसभापती श्रीमती अर्चना पाठक आणि समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर यांच्यासह धरमपेठ झोन क्र. २, हनुमाननगर झोन क्र. ३, धंतोली झोन क्र.४ व नेहरुनगर झोन क्र.५ या झोनमध्ये जागेची पाहणी शुक्रवारी ( २० ऑगस्ट) रोजी करण्यात आली.

Advertisement

धरमपेठ झोन क्र. २ चे सहाय्यक अधीक्षक श्री. बरसे यांनी झोन अंतर्गत निर्धारित करण्यात आलेली जागा सभापती तथा उपसभापती यांना दाखविली. यावेळी धरमपेठ झोन सभापती श्री. सुनील हिरणवार उपस्थित होते. तसेच हनुमाननगर झोन क्र.३ मध्ये पोटोबा फुडस्टॉल करीता तेथील सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे यांनी फुडस्टॉलकरीता जागा दाखविली. यावेळी झोन सभापती श्रीमती कल्पना कुंभलकर उपस्थित होत्या. यानंतर धंतोली झोन क्र. ४ आणि नेहरुनगर झोन क्र. ५ मध्ये पोटोबा फुडस्टॉल उभारण्याकरीता सभापती व उपसभापती महिला व बालकल्याण समिती यांचेव्दारे जागेची पाहणी करण्यात आलेली असून झोन क्र. ४ मधील सहाय्यक आयुक्त श्रीमती किरण बडगे आणि झोन क्र.५ मधील सहाय्यक अधीक्षक श्रीमती गर्दे यांनी फुडस्टॉल करीता जागा दाखविली. जागेची पाहणी करतांना झोन क्र.४ च्या सभापती वंदना भगत प्रामुख्याने उपस्थित होत्या.

याप्रमाणे सभापती तथा उपसभापती महिला व बालकल्याण समिती यांनी समाजविकास अधिकारी यांच्यातर्फे १ ते १० तर्फे पोटोबा फुडस्टॉल उभारण्याकरीता जागेची पाहणी व निश्चीती करुन सर्व झोन मधुन जागा उपलब्ध करण्याबाबत रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर समाजकल्याण विभागातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येईल.