Published On : Mon, Jul 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महापारेषण चे नवेगाव-खैरी पम्पिंग स्टेशन येथे ४ तासांचे विद्युत शटडाऊन १२ जुलै ला

७५% नागपूरचा पाणीपुरवठा १२ जुलै ला राहणार बाधित.| आज कन्हान जलशुद्धीकरण केंद्र मध्ये 10 तास (8 ते 6) विद्युत पुरवठा होता बंद ...आसीनगर झोन, लकडगंज झोन, सतरंजीपूरा झोन आणि नेहरू नगर झोन चा पाणीपुरवठा आज झाला बाधित...
Advertisement

नागपूर: महापारेषण (MSETCL) यांनी मनसर -पारशिवनी सब-स्टेशन वरून येणाऱ्या ३३KV मुख्य विद्युत वाहिनीवर मोठा बिघाड वाचविण्यासाठी तसेच काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी नवेगाव खैरी येथील कच्च्या पाण्याचा (raw water ) चा पुरवठा करणाऱ्या पम्पिंग स्टेशन वर ४ तासांचे पॉवर शटडाऊन येत्या १२ जुलै २०२३ (बुधवारी ) घेण्याचे ठरविले आहे . ह्या ४ तासांच्या पॉवर शटडाऊन (सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत) मुळे नागपूर महानगरपालिकेच्या नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन चा वीजप्रवाह खंडित होईल आणि पम्पिंग स्टेशन केंद्रावरून नागपुरातील गोरेवाडा येथील पेंच-१जलशुद्धीकरण केंद्र , पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्र आणि पेंच- ३ जलशुद्धीकरण केंद्र तसेच गोधनी स्थित पेंच-४ ह्या जलशुद्धीकरण केंद्रातून कच्च्या पाण्याचे पम्पिंग खंडित होणार आहे.

महत्वाचे म्हणजे , आज १० जुलै २०२३ (सोमवारी ) कन्हान जलशुद्धीकरण केंद्र मध्ये 10 तास (सकाळी 8 ते संध्याकाळी 6) पर्यंत विद्युत पुरवठा बंद होता …त्यामुळे आशीनगर झोन, लकडगंज झोन, सतरंजीपुरा झोन आणि नेहरू नगर झोन चा दुपारचा आणि साध्याकळचा पाणीपुरवठा बाधित झाला होता .

Today’s Rate
Thursday 03 Oct. 2024
Gold 24 KT 76,100 /-
Gold 22 KT 70,800 /-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपल्या माहितीकरिता नागपूर महानगर पालिकेच्या नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन वरून नागपूर शहरातील गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्र आणि गोरेवाडा तलाव तसेच गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र येथे कच्च्या पाण्याचा (raw water ) चा पुरवठा शुद्धीकरण करण्याकरिता केल्या जातो .

Advertisement

ह्या पॉवर शटडाऊन मुळे नागपूर शहरातील गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्र आणि गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र वरून पाणीपुरवठा होणाऱ्या जवळपास ७५ ते ८० टक्के नागपूरचा पाणीपुरवठा येत्या १२ जुलै २०२३ (बुधवारी ) रोजी बाधित राहण्याची शक्यता आहे .
नवेगाव खैरी पॉवर शटडाऊन: १२ जुलै २०२३ (बुधवारी ) पाणीपुरवठा बाधित राहणारे जलकुंभ :

पेंच -१ जलशुद्धीकरण केंद्र : मेडिकल फीडर (गांधीबाग झोन ), बर्डी फीडर (धरमपेठ झोन), छावणी जलवाहिनी, राजभवन जलवाहिनी, इटारसी जलवाहिनी , सदर फीडर आणि गोरेवाडा जलकुंभ (मंगळवारी झोन) बोरियापुरा फीडर लाईन (सतरंजीपुरा झोन), वंजारी नगर ओल्ड लाईन , वंजारी नगर नव लाईन, हनुमान नगर आणि रेशीमबाग (धंतोली झोन) पाणीपुरवठा भाग

पेंच २ आणि ३ जलशुद्धीकरण केंद्र: लक्ष्मी नगर झोन ( गायत्री नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, लक्ष्मी नगर जुने जलकुंभ, टाकली सिम जलकुंभ,जयताळा जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ , धरमपेठ झोन ( राम नगर जलकुंभ, सेमिनरी हिल्स नवीन जलकुंभ, सेमिनरी हिल्स जुने जलकुंभ , सिविल लाईन DT , दाभा जलकुंभ, टेकडी वाडी जलकुंभ, रायफल लाईन, फुटाला लाईन, , हनुमान नगर झोन (चिंचभवन जलकुंभ , ) मंगळवारी झोन (गिट्टीखदान जलकुंभ ), गांधीबाग झोन (बोरियापुर/खदान जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ आणि सीताबर्डी फोर्ट १ आणि फोर्ट २ जलकुंभ)

गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र : नारा जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ , म्हाळगी नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन), हुडकेश्वर आणि नरसाळा ग्रामीण चा पाणीपुरवठा , सक्करदरा १, २ आणि ३ जलकुंभ (नेहरू नगर झोन)

मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे सहकार्य करावे…