नागपूर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी हालचाली सुरु केल्या आहेत.नागपुरातही आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं घरी औक्षण करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नितीन गडकरी यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
देवेंद्रजींच्या रुपाने महाराष्ट्राचा चित्र बदलू शकणारा नेता नागपूरने महाराष्ट्राला दिला, असे विधान गडकरी यांनी केले.
देवेंद्रजींनी महाराष्ट्रात नागपूरच्या विकासाला प्राधान्य दिले. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तर काँग्रेसने 60-65 वर्ष देशावर राज्य केले. काँग्रेस जे 60 वर्षात करु शकली नाही, ते महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये देवेंद्रजींनी करुन दाखवल्याचे विधान गडकरी यांनी केले.