आमदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
आंबेडकर यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही, असे सांगत शिंदेंच्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली. काँग्रेस आणि वंचितच्या युतीची शक्यता आता धूसर झाली आहे. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे.
मुंबईतून वर्षा गायकवाड यांचे तिकीट जाहीर केल्यावर त्यांनी दुसऱ्याच दिवशी वंचितचे तिकीट जाहीर केले. संविधान वाचवणे आणि भारतीय जनता पक्षाला (BJP) सत्तेतून बाहेर काढणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यात तथ्य नाही.
काय बोलतात, याकडे लक्ष देण्याची आम्हाला गरज नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेसचा भाजपसोबत छुपा समझोता, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे, त्यावर नाना पटोले म्हणाले, कोणाचं विश्लेषण करायचे आणि त्यांना सर्टिफिकेट देण्याचे अधिकार आंबेडकर यांना कोणी दिलेले नाहीत. त्यामुळे आंबेडकर यांनी याविषयावर चर्चा करूच नये, असे पटोले म्हणाले.