श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आला.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी हे गाव भिवापूर तालुक्यातील असून या गावांमध्ये गेल्या ६० वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेतील विचार आत्मसात करून प्रत्यक्ष स्वरूपात ग्रामसफाई आणि सामूहिक कार्यक्रम यशस्वीपणे राबवल्या जाते.
प्राण प्रतिष्ठा सोहळा या निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळा तर्फे ५ फेब्रुवारी ते आठ ८ फेब्रुवारी पर्यंत.
पहाटे गुरुदेव सेवा मंडळा तर्फे संपूर्ण गावांमध्ये ग्रामसफाई करण्यात आली. त्यानंतर ६ फेब्रुवारी ला खंजरी भजनांचा कार्यक्रम. आणि ७ फेब्रुवारी ला महाराजांच्या मूर्तीचे मोठ्या उत्साहामध्ये रामधून च्या माध्यमातून भजनाच्या गजरात संपूर्ण गावांमध्ये मोठ्या उत्साहात रामधून काढण्यात आली. महाराजांनी दिलेल्या ग्रामगीताच्या माध्यमातून समाजामध्ये, युवक वर्गांमध्ये चांगल्या विचारांची आत्मसात करण्याकरता, चांगले विचारांचे आदान प्रदान करण्याकरिता, समाज प्रबोधन करून, एक नवीन पिढीला उत्साह निर्माण करण्याकरता महाराजांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. आणि त्या माध्यमातून एक समाजाला नवी दिशा देण्याचे काम करण्याचा प्रयत्न गुरुदेव सेवा मंडळ च्या माध्यमातून करण्यात आला. रामधुन ही प्रार्थना स्थळापासून तर संपुर्ण गावाला फेरा मारून जय घोष्याच्या गजरात प्रार्थना स्थळावर पोहोचली.
त्यानंतर विधिवत पूजा करून मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. सायंकाळी श्री गुरुदेव मंडळ मोझरी या संस्थेच्या माध्यमातून खंजरी भजन मंडळ (नेर),आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर ८ फेब्रुवारी ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची सांगता कार्यक्रम करण्यात आला. सांगता कार्यक्रमाला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता माजी सरपंच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवधिकरी प्रभाकर माळवे, अरुणजी टाले, किसन टाले, वासुदेव सोनटक्के, रुपेश मेश्राम, राहुल टाले, नितेश मेश्राम, घनश्याम माळवे, किशोर वाकडे, अमृत माळवे,नामदेवजी शेंडे, अरविंद चिकराम, प्रमय माळवे, संगम टाले, अमोल सोनटक्के, नितेश माळवे, गौरव टाले, महिला मंडळ, युवक मंडळ, बाळगोपल आणि समस्त श्री गुरुदेव सेवा मंडळ सेवक उपस्थित.