Published On : Sat, May 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पारशिवनी तालुक्याचे खरीप हंगाम २०२२-२३ चे पुर्व नियोजन

Advertisement

कन्हान : – मानसुन दहा दिवसावर आला असता नाच पारशिवनी तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी पूर्व कामाला वेग आला आहे. ज्यांच्याकडे बैलजोडी आहेत ते जोडीच्या सहाय्याने तर ज्यांच्या कडे नाही ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत मशागत करून घेत आहे. तालुक्यात यंदा ३३ हजार २७१ हेक्टर क्षेत्र लागवडी खाली येणार आहे. यंदा सोयाबीण ऐवजी कापसाला शेतकरी पसंती देणार असल्याचा अंदाज आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतात नांगरणी, वखरणी उन्हाळ्यात करतात. सध्या खरीप हंगामातील शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेत कऱ्यांकडे बैजोडीचे प्रमाण कमी झाल्याने बहुतेक शेतकरी ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी करित असल्याचे चित्र दिसुन येते आहे.

रोहिणी नक्षत्र संपत येत असुन नव तपाचे नऊ दिवस तापणार की पावसाने ओले करणार याकडे शेत कऱ्यांचे लक्ष लागले आहे. ८ जुन पासून मृग नक्षत्र प्रारंभ होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सुन यावर्षी लवकर सक्रिय होणार, मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत असुन ग्रामीण भागात शेतकामांसाठी मजुर मिळणे कठीण झाले आहे.अनेक ठिकाणी त्याचा खरीप हंगामाच्या कामावरही परिणाम झाला आहे. पुर्वी गावातच मजुर शेतकामासाठी उपल ब्ध होत होते. परंतु सध्या अतिरिक्त पैसे देऊनही शेती कामासाठी मजुर येण्यास नकार देत असुन शेतकऱ्यां च्या अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे पुरूष मजुरां ना ३५० ते ४०० रुपयां पर्यंत रोज द्यावा लागतो. मागी ल हंगामात विविध कारणाने सोयाबीन पीक शेतकऱ्यां च्या हाती लागले नाही. कापसाला चांगला भाव मिळा ला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल कापसाच्या लागव डी कडे दिसुन येत आहे.

Gold Rate
Friday 28 March 2025
Gold 24 KT 89,400 /-
Gold 22 KT 83,100 /-
Silver / Kg 101,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पारशिवनी तालुका कृषी अधिकारी श्री वाघ यांच्या माहीती नुसार यंदा तालुकात ३३.२७१ हेक्टर मध्ये लागवड होणार असून यात भात, कापुस, सोया बिन, तुर, ज्वारी, मका व इतर यात पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र ३०९७४.२ हे आर, २०२२-२३ ला अपेक्षित पेरणी ३३२७१ हे आर, एकूण लागणारे वियाणे (क्विंटल) ५८३१.६१८ , बियाणे मागणी ( क्विंटल ) सहकारी ४६८.६५ , खाजगी ५३६२.३६८ चे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी अतिवृष्टी ने व पिकावरील किडीने कमी झालेल्या उत्पादना मुळे शेतकरी निराश झाला. तर यावर्षी पेरणीस लवकर सुरूवात होणार अशी खात्री शेतकऱ्यांना आहे.

Advertisement
Advertisement