Published On : Fri, Feb 14th, 2020

प्रेमाच्या विरहात अल्पवयीन प्रेयसीची विषारी द्रव्य पदार्थाच्या सेवनाने मृत्यु

Advertisement

कामठी :-हिंगणघाट जळीत कांडाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असतानाच कळमेश्वर तालुक्यातील चौदामैल येथे एका प्रियकराने प्रेयसीच्या समोरच गळफास लावून मृत्यूला कवटाळल्याची घटनेला विराम मिळत नाही तोच कामठी तालुक्यातील जाखेगाव रहिवासी एका 16 वर्षोय अल्पवयीन प्रेयसीने प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेमाच्या विरहात उंदिर मारण्याची औषध असलेले विषारी द्रव्य औषध प्राशन करून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची हृदवीदारक घटना नुकतीच उघडकीस आल्याने तालुक्यात विविध चर्चेला उत आले आहे तर यासंदर्भात आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रियकर आरोपी अंकित ठवरे रा जाखेगाव विरुद्ध भादवी कलम 306 अनव्ये गुन्हा नोंदविला असून आरोपी अजूनही अटकेबाहेर असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्राप्त माहिती नुसार कामठी तालुक्यातील जाखेगाव येथील मानवटकर कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुली ला अचानक उलटी येऊन प्रकृती बिघडल्याने रात्री 12 वाजता तिच्या भावाने नजीकच्या मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलविले तात्पुरती प्रकृती बरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजून प्रकृती बिघडल्याने पीडित मुलीची आई व मोठी बहीण नेहा ने तिला उपचारार्थ भंडारा येथील प्रयास हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले त्याचवेळी आरोपी अंकित ठवरे यांनी मृतक मुलीच्या फोन वर सांगितले की मृतक सेजल ने उंदीर मारण्याची विषद्रव्य औषध प्राशन केले आहे तसेच पीडित तरुणीला विचारले असता तिने सुद्धा विषारी औषध खाल्याचे सांगितल्या वरून सर्वांना एकच धक्का बसला तर पीडित तरुणीची प्रकृती अजूनच खालावल्याने त्वरित नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून अतिदक्षता विभागात हलविण्यात आले मात्र अंतता अतिशयोक्ती प्रकृती खलावल्याने पीडित अल्पवयीन तरुणीने जगाचा अखेरचा निरोप घेतला.

Advertisement
Wenesday Rate
Friday 27 Dec. 2024
Gold 24 KT 76,800/-
Gold 22 KT 71,400/-
Silver / Kg 89,100/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासंदर्भात मृतक सेजल च्या वडीलाने यामृत्युला आरोपी अंकित ठवरे वय 22 वर्षे रा जाखेगाव कारणीभूत असून यासोबत मृतक तरुणींचे मागील दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते यादरम्यान सदर आरोपिने लग्नाचे आमिष देत प्रेमसंबंध गाठले मात्र पीडित मुलीने लग्नाची मागणी केली असता लग्नास नकार दिल्याने अखेर पीडित अल्पवयीन मुलीने विषारी द्रव्य औषध प्राशन केले असल्याच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला मात्र आरोपीला अजूनही अटक करण्यात न आल्याने मौदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.तर दुसरीकडे मृतक अल्पवयीन मुलीचे आई वडील आरोपीच्या शिक्षेची मागणी च्या प्रतीक्षेत आहेत…..

संदीप कांबळे कामठी

Advertisement