नागपूर : जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. मॉर्निंग कंसल्टच्या सर्व्हेत मोदींना सर्वाधिक ७६ टक्के इतके रेटिंग मिळाले आहे.या सर्व्हेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी सहाव्या क्रमांकावर आहेत.
तर अध्यक्ष जो बायडेन लोकप्रिय नेत्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. मोदी यांना लोकप्रिय नेत्यांच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर भाजपच्या गोटात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
मोदीनंतर दुसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर असून त्यांना ६६ टक्के इतके रेटिंग मिळाले आहे. तर तिसऱ्या क्रमाकांवर स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती अलेन बारसेट, चौथ्या क्रमांकावर ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना लोकप्रियतेच्या यादीत स्थान मिळाले आहे.
दरम्यान मॉर्निंग कंसल्ट ही संस्था प्रत्येक आठवड्यात लोकप्रिय नेत्यांची रेटिंग जाहीर करते. गेल्या अनेक दिवसांपासून या रेटिंगमध्ये मोदी सातत्याने अव्वल स्थानावर आहेत.