Published On : Mon, Mar 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

पंतप्रधान मोदी उद्या विदर्भातील रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन करणार !

Advertisement

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी, १२ मार्चला रेल्वेशी संबंधित विदर्भातील बडनेरा, अकोला आणि नागभिडमधील विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. तत्पूर्वी २६ फेब्रुवारीला पंतप्रधानांनी विदर्भातील रेल्वेच्या अनेक विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण केल्यानंतर २८ फेब्रुवारीला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखविला होता.

उद्या म्हणजेच १२ मार्चला पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण करणार आहेत. याचवेळी ते वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या १० वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवतील.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधानांकडून ज्या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे, त्यात विदर्भातील बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कार्यशाळेचे, अकोला येथील रेल कोच रेस्टॉरेंटचे आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथील जन औषधी केंद्रांच्या उद्घाटन समारंभाचाही समावेश आहे. या कार्यक्रमाच्या संबंधाने मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Advertisement
Advertisement