वाराणसी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोदी हे सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत.
पीएम मोदींच्या नामांकनावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेतेही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गंगा मातेचे पूजन केले. त्यानंतर त्यानी काल भैरव मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घेतला.
मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल कारण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, एकनाथ शिंदे, चंद्राबाबू नायडू, संजय निषाद, ओम प्रकाश राजभर, आसामचे नेते प्रमोद बोरा, हरदीप सिंग पुरी आदी नेते याठिकाणी पोहोचले.
दरम्यान मोदी 2014 पासून सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत.