Advertisement
मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबई भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वायुदलाच्या विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण केले. त्यांच्यासमवेत रेल्वेमंत्री पियुष गोयल होते.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री यांचे आभार व्यक्त केले.
खासदार रावसाहेब दानवे, आमदार आशिष शेलार मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा तसेच तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस महासंचालक सतीश माथूर ,मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यावेळी उपस्थित होते.