नागपूर : अंबाझरी पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक प्रिन्स उर्फ प्रिन्सपाल सिंग तुलीयांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रिन्सविरोधात महिनाभरात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून ही घटना आंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या आवारात पीडित ५४ वर्षीय महिला राहत असून 16 मे रोजी प्रिन्स महिलेच्या घरी आला. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करून असभ्य वर्तन केले. महिलेबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या.
या गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट केल्या. हा प्रकार लक्षात येताच महिलेने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर बुधवारी रात्री प्रिन्सविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिलेचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रिन्सच्या कुटुंबाशी वाद सुरु आहे.
यासंदर्भात एक व्हिडीओ किल्पही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी, प्रिन्सने क्लबच्या व्यवस्थापकाला सिव्हिल लाइन्सच्या सीपी क्लबमध्ये प्रवेश न दिल्याने मारहाण केली होती.