नागपूर: सर्वप्रथम कामाला प्रधान्य द्या तसेच आपली जबाबदारी ही पूर्णपणे पार कशी पाडता येईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असे प्रतिपादन अग्निशमन आणि विद्युत समिती सभापती संजय बालपांडे यांनी केले. अग्निशमन आणि विद्युत समिती सभापती तसेच सदस्यांच्या पदग्रहण समारोहप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपसभापती प्रमोद चिखले, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा, वनिता दांडेकर, सुमेधा देशपांडे, सयैदा बेगम निजामुद्दीन, राजेश घोडपागे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र देवतळे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना बालपांडे म्हणाले, प्रशासनाने आपले परिश्रम पणाला लावून कार्य करावे मी आणि माढ्या समितीतील सर्व सदस्य हे लागेल ती मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. महापौरांनी सभापती व सर्व समिती सदस्यांना शुभेच्छा देत आगामी काळात ज्या गोष्टींची गरज विभागाला पडेल त्या त्या सर्व गोष्टी पुरविण्यात येतील असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन सुनिल राऊत, तर आभार प्रदर्शन केशवराव कोठे यांनी केले. कार्यक्रमला अग्निशमन विभागाचे तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.