नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने टँकरला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले.जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये ट्रव्हल्सच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहे. महामार्गावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरु असते. रस्ते खराब असल्याने सध्या पावसाळ्यात खड्डेमय मार्ग बनले आहेत. त्यातच अपघाताची मालिका संपत नाही. सात महिन्यांचा आढावा घेतल्यास दिवसाआड एक जण जखमी तर दोन दिवसांनी एकाचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.