कामठी :- प्रदूषण मुक्त वातावरण निर्माणकरण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून झाडाचे संवर्धन करण्याचे आव्हान कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी तालुक्यातील चिंचोली येथे सरकारी पहाडीवर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले
कृषी दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय कामठी च्या वतीने तालुक्यातील चिचोली येथील सरकारी पाहंडीवर वृक्षारोपण करून कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला तहसीलदार अरविंद हिंगे यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार सुनील तरोडकर ,एस टी उके, रंजीत भुसावर,अमोल पोल, राजेश काटोके ,बेबीनंदा झोटीग, महेश कुलदीप पवार ,आगलावे ,वेंकट बिराजदार ,वर्षा भुजाडे ,उषा धुर्वे ,श्रुती सुरकर, राम उरकुडे ,युवराज चौधरी सह कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,सर्व मान्यवरांच्या हस्ते सरकारी पाहळीवर 753 रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तहसीलदार अरविंद हिंगे म्हणाले प्रत्येकांनी एका वृक्षारोपण करून त्याचे झाडात रूपांतर करण्यासाठी संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन वर्षा भुजाडे यांनी केले आभारप्रदर्शन अमोल पौंड यांनी मानले.
संदीप कांबळे कामठी