नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र याचा सर्व स्तरावरून विरोध करण्यात येत आहे. MSEDCL कडून जबरन ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलवून प्री-पेड मीटर लावल्या जात असल्याचा प्रकार सुरु आहे.
या माध्यमातून ग्राहकांच्या खिश्यातून हजारो कोटी रुपये वसूल केले जाणार आहे.
हे पाहता नागरिक संघर्ष समितीतर्फे जनाक्रोश समितीने बुधवारी व्हेरायटी चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून प्री-पेड मीटर रद्द करण्याची मागणी केली.आंदोलनकांनी फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर पोलीसांना आंदोलकांना ताब्यात घेतले.
या आंदोलनात समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व नरेश निमजे आणि मुकेश मासुरकर यांनी केले असून अरुण वनकर, इंद्रभान खिंचे, प्रशांत नखाते आदी सदस्य सहभागी झाले होते.