महाराष्ट्र प्रदेश सेवा काँग्रेस सेवादल आणि ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने आज महानगरपालिकेने खाजगीकरणाच्या नावाने नागपूर शहरातील उद्याने विकायला काढली आहे. दिवाळे निघालेल्या फेरफटका मारणाऱ्या नागरिकांवर प्रवेश शुल्क आकारून मोकळा श्वास घेण्याचा व व्यायाम करण्याचा माणसांचा हक्क नाकारण्याचा प्रयत्न आरंभिला आहे.
मेट्रो आणि शहरीकरण्याच्या नावावर लादलेल्या वेगवेगळ्या करामुळे आधीच जनता त्रस्त झाली असताना नव्याने लादलेल्या उद्दान प्रवेश शुल्काने जनता संतप्त झाली आहे. अगोदर मोदी ने देश विकण्याचा सपाटा लावला असताना आता त्यांच्या पक्षाच्या मनपाने उद्याने विकण्याचा प्रण केलेला दिसतोय.
अशा परिस्थितीत सुजान नागपूरकरांनी लोक लढा उभारण्याची गरज आहे. यामध्ये प्रवेश शुल्क व पार्किंग शुल्क आकारण्याचा ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल निषेध करीत आहे यासाठी ये त्या ६ फरवरी पासून युवानेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वाखाली व त्यानंतर लगेच मोर्चा त्याद्वारे जनजागृती करण्यात येईल. शहरातील प्रत्येक उद्यानातील महानगर पालिकेवर मोर्चा नेऊन जनतेच्या भावना कशा प्रखर आहे, ते प्रदर्शित करण्यात येईल.
असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे समन्वयक व जेष्ठ नागरिक मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश ढगे यांनी पत्रपरिषदेत केले आहे. पत्रपरिषद मध्ये उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती यावेळी गिरीश पांडव, राजगोविंद खोब्रागडे डॉ. प्रकाश ढगे भाऊराव ढोक, पंकज पांडे, गजानन काळे, डॉ. वसंतराव रहाटे, प्रभाकर हुड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस सेवादल अध्यक्ष प्रवीण आगरे, संजय हांडे, चिंतामण तिडके हे उपस्थित होते.