महापुरुषांची सामुहिक जयंतीसाठी गोळा केलेल्या निधीतून मनपाला सहकार्य
नागपूर : नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना तसेच मनपातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या वतीने महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी गोळा केलेला एक लाख २० हजार रुपये निधी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या कोव्हिड-१९ प्रर्दुभावाला रोखण्याच्या सेवा कार्याकरिता देण्यात आला. मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याहस्ते हा निधी समाज सेवा संस्थेस सुपूर्द केला.
नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना तसेच मनपातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने मनपामध्ये दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येते. कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी सामुहिक जयंती समारंभ साजरा करणे शक्य नाही.
त्यामुळे कोव्हिडच्या या लढ्यात मनपाला सहकार्य करून वेगळ्या पद्धतीने ही जयंती साजरी करण्याचे संघटनेच्या वतीने ठरविण्यात आले. त्यानुसार नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना तसेच मनपातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या वतीने एक लाख २० हजार रुपये निधी गोळा करून तो मनपातर्फे सुरू असलेल्या सेवा कार्याकरिता देण्यात आला. याशिवाय कोरोनाच्या संकटात अविरत सेवा कार्य बजविणा-या मनपाशी संलग्नीत स्वयंसेवी संस्था समता सैनिक दल आणि आर्यलोक शैक्षणिक संस्था यांना प्रत्येकी ६० हजार रुपये डी.डी.च्या माध्यमातून संघटनेतर्फे देण्यात आले.
संघटनेचे महासचिव नंदकिशोर भोवते, अभि. कल्पना मेश्राम, वसंत मून, मनोहर बोरकर, सहायक आयुक्त अशोक पाटील, राजू भिवगडे, विजय हुमणे, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, राजेंद्र रहाटे, गिरीश वासनिक, राजेश दुफारे, राजकुमार वंजारी, उज्ज्वल लांजेवार, ॲड. अजय माटे, विशाल शेवारे, जयंत बन्सोड, दिलीप तांदळे, गौतम पाटील, राजकुमार मेश्राम, सुषमा नायडू, सुषमा ढोरे, ज्योती आवळे, पुष्पा गजघाटे, सुनिता पाटील, ज्योती जाधव, स्मिता तामगाडगे, प्रदीप खोब्रागडे आदींनी या कार्यासाठी सहकार्य केले.